Home » »


रेशीम' शेतीमुळे सुखी संसाराच्या गाठी' मजबूत
आलेगावच्या युवा शेतक-याचा शासनातर्फे सन्मान
विदर्भ म्हटला म्हणजे राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्माहत्तेचा भाग अशीच ओळख निर्माण झालेली आहे. परंतु स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास व संकटावर मत करण्याचे धाडस असले तर कोणतेही काम यशस्वी होते. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव येथील युवा शेतकरी पांडुरंग वसंत गि-हे यांनी आणून दिला आहे. बारावी पर्यंतचे शिक्षण असलेल्या या शेतक-याने रेशीम शेती उद्योगातून वर्षभरात अडीच लाखांच्यावर उत्पन्न घेऊन या परिसरातील शेतक-यांना रेशीम शेतीचा मार्ग दाखवला आहे. त्याच्या कामाची दखल केंद्रीय वस्त्रउद्योग मंत्रालयाने घेत उत्कृष्ट रेशीम उत्पादक म्हणून त्याला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
     घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने शिक्षणाच्या वाटाही बारावीनंतर बंद झाल्या. उदरनिर्वाहासाठी घरची ४ एकर शेती आहे. परंतु आतापर्यंत केलेल्या पारंपारिक शेतीमुळे फारसा उत्पादनात फरक पडला नाही. व संसाराचा गाडा हाकताना आर्थिक पेच तसाच कायम राहिला. यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत असतांना गावातून व परिसरातील शेतक-यांकडून रेशीम शेतीची माहिती पांडुरंग गि-हे यांना मिळाली. उत्सुक्तेपोटी त्यांनी हि माहिती घेऊन रेशीम शेती करण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी झाले. जिद्द, चिकाटीच्या जोरावर ग्रामीण शेतक-याला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. या युवा शेतक-याने रेशीम शेतीतून अधिक उत्पन्न घेत आत्महत्या करणा-या शेतक-यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. पांडुरंग गि-हे सांगतात कि त्यांच्यासह कुटुंबात आई, वडील पत्नी मुलगा मुलगी असे सहा जण आहेत.
   चार वर्षापूर्वी पत्नीसह दुस-यांच्या शेतावर काम करीत होते. कारण पारंपारिक शेती करण्याच्या पद्धतीमुळे घरच्या शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. घरची परिस्थिती सुधारली पाहिजे मुला मुलीचे शिक्षण, आरोग्यावरील होणारा खर्च भागवता यावा या चिंतेत असताना त्यांना रेशीम शेतीचा मार्ग गवसला. सन २०११ पासून त्यांनी २ एकर शेतीमध्ये रेशीम शेती करणे सुरु केले. ब-यापैकी उत्पन्न मिळूलागल्याने त्यांनी जास्तीत जास्त लक्ष घरच्या शेतीकडे दिले. अकोला जिल्हा रेशीम अधिकारी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्याकडूनही रेशीम शेतीची सविस्तर माहिती मिळाली. त्यांच्याकडून या व्यवसायाची तांत्रिक माहिती, लागवडीपासून तर बाजारपेठ पर्यंतची माहिती समजून घेतली. बंगरूळ, कोल्हापूर वरून अंडी मागवली. तसेच स्वतः शेतात अळ्या तयार केल्या. रेशीम कोष हे एका महिन्याचे पिक आहे. २०० अंडीपुंजीला २०० रुपये खर्च येतो. वर्षातून पाच वेळा ह्या माध्यमातून उत्पादन घेत असल्याचे पांडुरंग गि-हे सांगतात.
विक्री कर्नाटकमध्ये
सन २०१४-१५ मध्ये एका एकरातील तुतीच्या पाल्यावर रेशीम किड्यांच्या ९५० अंडीपुंजीचे संगोपन तयार केले. यामधून ७५० किलो रेशीमकोष मिळाले. त्याची विक्री कर्नाटक राज्यातील बंगरूळ येथील कोष मार्केटमध्ये केली. विक्रीचा दर प्रती किलो २५० रुपये मिळाला. त्यामुळे कोष विक्रीतून १,९८,१३६ रुपये मिळाले. तसेच ६०,००० रोप विक्रीतून मिळाले. म्हणजेच वर्षभरातील या उद्योगातून व रेशीम शेतीतून सुमारे २,६०,००० रुपये उत्पन्न पांडुरंग गि-हे या युवा शेतक-याने मिळवले आहे.
पुराकाराने गौरव
अल्पखर्चात विक्रमी उतपादन घेतल्याने केंद्रीय वस्रोउद्योग मंत्रालयाने दखल घेत गेल्या महिन्यात केंद्रीय वस्रोद्योग मंत्री संतोषकुमार गंगावर यांच्या हस्ते व कर्नाटकचे कृषीमंत्री ए.मंजू यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट रेशीम उत्पादक पुरस्कार देऊन बंगरूळ येथे त्यांना सन्मानित केले.




         शेतक-यांनी नवीन तंत्रज्ञान,वेगवेगळ्या उत्पादन व्यवसायाची माहिती घेऊन त्याचा स्वता पासून अंमलबजावणी केल्यास नक्कीच व्यवसाय वृध्दी होते. युवकांनी व्यासनाधीनतेकडे जाण्यापेक्षा शेतीतील बदलाचा व विविध उद्योगांचा अभ्यास करावा जेणेकरून आपल्या शेतीत हे प्रयोग केल्यास त्याचा लाभ आर्थिक स्थिती सुधारण्यावर होईल.
पांडुरंग वसंत गि-हे (शेतकरी)
पातूर जि.अकोला

0 comments:

Post a Comment

About

Total Pageviews

कृषीसेवक

कृषीसेवक
रावेर

श्री साईराम प्लास्टिक्स जळगाव

श्री साईराम प्लास्टिक्स जळगाव
जळगाव

Blog Archive

साप्ताहिक कृषीसेवक. Powered by Blogger.

bharti jawelars

bharti jawelars
bharti jawelars Raver

संदीप पाटील

संदीप पाटील
संदीप पाटील

Blogroll

Pages - Menu

Pages - Menu